Ad will apear here
Next
‘डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालय इमारतीचा पुनर्विकास तातडीने करावा’
ठाणे :  महापालिकेच्या वर्तकनगर येथील डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालयाच्या इमारतीचा तातडीने पुनर्विकास करण्याचे आदेश महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी रुग्णालयाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान प्रशासनास दिले.

 वर्तकनगर येथील महापालिकेच्या डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालयात शॉटसर्किट झाले. सुदैर्वाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही हानी झाली नाही. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सदर रुग्णालयाची पाहणी महापौर यांनी केली. या पाहणी दौऱ्यास उपमहापौर रमाकांत मढवी, स्थानिक नगरसेविका विमल भोईर तर प्रशासनाचे वतीने उपायुक्त अशोक बुरपल्ले, सहाय्यक आयुक्त चारुशिला पंडित, कार्यकारी अभियंता सुधीर गायकवाड, प्रदीप घाडगे, कनिष्ठ अभियंता रणधीर राणे, शैलेश हर्डीकर आदी उपस्थित होते.

डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालयाची इमारत २८ वर्षे जुनी आहे. सदर इमारतीच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव सन २०१७-१८च्या अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आला असून, यासाठी आर्थिक तरतूद केली असल्याची माहिती महापौर यांनी या वेळी दिली.

वर्तकनगर, लोकमान्यनगर, शास्त्रीनगर, येऊर, उपवन, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, पवारनगर व वागळे इस्टेट विभागातील रुग्ण येथे उपचारासाठी येत असतात. सध्याची लोकसंख्या विचारात घेऊन वाढीव खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश यापूर्वी प्रशासनास दिलेले आहेत.

डॉ. आनंदीबाई जोशी रुग्णालयात येणारे रुग्ण हे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील असतात, गोरगरीब नागरिकांना वरदान ठरलेल्या रुग्णालयाचा पुनर्विकास तातडीने करुन येथे आवश्यक व अद्ययावत सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील याबाबत आपण व्यक्तिश: लक्ष घालणार असल्याने येत्या २ ते ३ वर्षात सर्व सेवा-सुविधांनी युक्त असे रुग्णालय नागरिकांना उपलब्ध होईल अशी आशा महापौर यांनी या वेळी व्यक्त केली.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BYYGBF
Similar Posts
शैरील चार्ल्सचे अभिनंदन ठाणे : ‘वर्ल्ड नेक्स्ट टॉप मॉडल २०१७’ व ‘मिस टिआरा इंडिया २०१७’ विजेती शैरील चार्ल्स यांचे महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले व भावी काळासाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी सभागृह नेते नरेश म्हस्के, नगरसेवक योगेश जानकर, माजी नगरसेवक हिरा पाटील, उपायुक्त अशोक बुरपल्ले आदी मान्यवर उपस्थित होते
पोलिस स्टेशनचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने कावेसर व पारसिक या दोन्ही सुविधा भूखंडांवर नव्याने बांधण्यात आलेल्या कासारवडवली आणि कळवा पोलिस स्टेशनचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व सार्वजनिक बांधकाम एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर मीनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे
‘विसर्जन घाटावरील कामे पूर्ण करुन आवश्यक सेवा-सुविधा द्याव्यात’ ठाणे : महापालिका कार्यक्षेतील विसर्जन घाटांचे काम पूर्ण करुन आवश्यक सेवा-सुविधा देण्यात याव्यात  तसेच दरवर्षी निर्माण करण्यात येणारी कृत्रिम तलाव न करता मासुंदा तलावाच्याक धर्तीवर कायम स्वरुपी कृत्रिम तलाव तयार करण्यात यावे, असे आदेश महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांनी पाहणी दौऱ्या दरम्यान प्रशासनास दिले
जपानच्या विद्यार्थ्यांनी घेतली महापौरांची भेट ठाणे : 'क्यूटो सानगयो युनिव्हर्सिटी ऑफ जपान'च्या विद्यार्थ्यांनी सात सप्टेंबर रोजी महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांची भेट घेतली. या विद्यार्थ्यांनी ठाणे महापालिका राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. महापालिकेत महापौर, उपमहापौर, सभागृहनेते तसेच लोकप्रतिनिधी निवडप्रक्रियेसंदर्भातही माहिती करुन घेतली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language